#सिताफळ_लागवड:-
पुरंदरच्या या जातीची फळे आकर्षक आणि आकाराने मोठी असून फळाचे वजन हे 360 ते 388 ग्राम असून गराचे प्रमाण हे 45 48 टक्के आहे. प्रत्येक झाडापासून 118 ते 154 फळाचे उत्पादन मिळते फळातील विद्राव्य घटकांचे प्रमाण 22 ते 24 टक्केव घट्ट रसाळ आणि आल्हाददायक असतो घरातील पाकळ्या पांढऱ्याशुभ्र असून त्यांची संख्याही जास्त आहे फळात बियांची संख्या अतिशय कमी असून जातीच्या फळांचा ग्राम पासून तयार केलेल्या रबडीला जास्त मागणी आहे.
#हवामान :-
सीताफळासाठी हवामान लक्षात घेता कोरडे व उष्ण हवामान सिताफळास मानवते. कुठल्याही परिस्थितीत तग धरून जिवंत राहणे हे या फळझाडाचे वैशिष्ट्य आहे. सीताफळास जास्त पाण्याची गरज असते आणि फळे येताना उबदार व कोरडे हवामान असल्यास फळांमध्ये गोडी चांगली येते मात्र दमट हवामानात वाढ चांगली होते.
जमिन:-
सीताफळ या पिकासाठी हलकी ते मध्यम सांगली निचरा होणारी दोन ते तीन टक्के उताराची सेंद्रिय पदार्थ भरपूर असणारी जमीन असावी लागते. काळी भारी पाणी साचून राहणारी अल्कलीयुक्त अगर चोपण जमिनीत लागवड करू नये तसेच एक फुटाच्या खोलीवर खडक लागल्यास लागवड थांबवावी.
#लागवड :-
सिताफळ सिताफळाची लागवड करताना पाऊस पडल्यानंतर खड्ड्यांमध्ये कलमे अगर रोपे लावावीत रोपे लावताना मध्य भागी लहान खड्डा करून लावावी तसेच माती हाताने दाबून काठीचा आधार देउन बांधावी व पाऊस नसेल तर लगेच झारीने पाणी द्यावे. सीताफळ लागवड अंतर व्सियवस्ताथित ठेवावे लागते. फळाचे लागवडीपूर्वी जमीन चांगली नांगरून कुळवून उन्हामध्ये तापवुन घ्यावे नंतर आपणास लागवड करावयाची आहे त्या अंतरानुसार खड्डे घ्यावेत प्रत्येक खड्ड्यात एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 100 ग्राम दोन टक्के मिथिल पॅराथिऑन पावडर यांचे मिश्रण टाकावे सोबत १०किलो शेणखत टाकावे त्याच्या वापरामुळे सिताफळाच्या वाढीस मदत होते.
#वळण_व_छाटणी :-
झाडांना योग्य वळण देण्यासाठी वाढीच्या सुरवातीच्या काळात हलक्या छाटणीची आवश्यकता असते. झाडे योग्य वळण देऊन एका बुंध्यावर वाढवली तर झाडे डोलदार वाढतात. अन्यथा अनेक फांद्या असलेले झुडूप तयार होते. वाढ कमी होऊन उत्पादन कमी राहते. - मिनीपासून १ मीटर खोडावरील सर्व फुटवे काढून त्यांच्या चारही बाजूने फांद्या विखुरलेल्या राहतील, अशा मोजक्याच फांद्या ठेवाव्यात. जुन्या, वाळलेल्या, अनावश्यक आणि गर्दी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात. बागेत भरपूर सूर्य प्रकाश व हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी.
लागवडीनंतर रोप ४ ते ५ महिन्यांत १.५ ते २ फुटाचे झाल्यावर त्याला ६ इंच ठेऊन वरील शेंडा कापून टाकावा. नंतर खोडातून येणाऱ्या फांद्यातून फक्त २ किंवा ३ फांद्या ठेवाव्यात. बाकीच्या फांद्या काढून घ्याव्यात. या फांद्यांना पुन्हा ४-५ महिने वाढू द्यावे. परत V आकाराच्या दोन फांद्या प्रत्येक मुख्य फांदीला ठेऊन इतर फांद्या काढून टाकाव्यात. म्हणजे जर जून – जुलै मध्ये लागवड केली असेल तर पहिली छाटणी ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये आणि दुसरी छाटणी मे – जून महिन्यामध्ये करावी. अशा प्रकारे छाटणी केल्यास दोन वर्षात १६ ते २४ फांद्याचे उत्कृष्ट झाड तयार होते.
#खते:-
पूर्ण वाढलेल्या झाडास ३० ते ४० किलो शेणखत, नत्र २५० ग्रॅम, स्फुरद १२५ ग्रॅम व पालाश १२५ ग्रॅम प्रति झाड प्रति वर्ष. नत्र दोन समान हफ्त्यांमध्ये विभागून द्यावे. शेणखताबरोबर ॲझोस्पीरीलम व पी.एस.बी. या जीवाणू खतांचा वापर करावा.
#टिप - अधिक माहितीसाठी साई हायटेक नर्सरी सिंगापूर येथे खालील नंबर वर संपर्क करावा.
🌴साई हायटेक नर्सरी🌴
मु.पो.सिंगापूर ता.पुरंदर जि.पुणे.
Mob No.: 9822900546, 9049431068.
Facebook Page :- https://www.facebook.com/saiHitechnurseryshingapur/
.jpg)
.jpg)

No comments:
Post a Comment