Thursday, 30 June 2022

सिताफळ_लागवड | Sugar Apple Plantation | साई हायटेक नर्सरी मु.पो.सिंगापूर ता.पुरंदर जि.पुणे. | (+91) 9822900546



साई हायटेक नर्सरी
 मु.पो.सिंगापूर ता.पुरंदर जि.पुणे.
 Mob No.: (+91) 9822900546, (+91) 9049431068
Instagram Page :- https://www.instagram.com/saihitechnursery09/
Facebook Page :- https://www.facebook.com/saiHitechnurseryshingapur/

 

Monday, 20 June 2022

आंबा लागवड | Mango Tree Plantation | साई हायटेक नर्सरी सिंगापूर | Sai Hitech Nursery, Shingapur Pune

  

आंबा लागवड

जमिन:- पाण्याचा निचरा होणारी जमीन आंबा लागवडीसाठी योग्य असते. चुनखड व कठीण असणाऱ्या जमिनीमध्ये आंबा लागवड करू नये. चोपण व काळया जमिनीमध्ये सुद्धा आंबा लागवड शक्यतो टाळावी.

खड्डा:- जूनमध्ये आपणास लागवड करावयाची असल्यास आपण एप्रिल महिन्यात एक मीटर बाय एक मीटर चा खड्डा घ्यावा व पूर्ण एक महिना तो उन्हामध्ये तापुन द्यावा. मे महिन्यामध्ये तो खड्डा भरावयास घ्यावा व प्रथम त्यामध्ये 50 ग्रॅम थाईमीठ टाकावे नंतर आपल्या शेतातील पालापाचोळा टाकावा, पालापाचोळा वरती थोडी माती टाकून त्यावरती 100 ग्रॅम सुपर सिंगल फॉस्फेट टाकावे व नंतर त्यावर ती दोन घमेली शेणखत टाकून खड्डा बुजवून घ्यावा व झाडाला आधार देण्यासाठी एक मधोमध काठी लावावी.

:https://maps.google.com/?cid=17826365743732073278

लागवड:- आंबा लागवड करताना शक्यतो लहान रोपांची निवड करावी रोपे जर मोठी असतील तर त्या रोपांची पिशवी ही मोठी असली पाहिजे जेणेकरून त्या झाडांच्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे झालेली असावी. लागवड करताना त्या झाडाची पिशवी अलगद ब्लेडने कापून घ्यावी व त्या मातीचा गड्डा फुटू  देऊ नये. पिशवी काढल्यानंतर अलगच हे झाड आपण खोदलेल्या खड्ड्यात लावावे व त्याला वाऱ्यापासून संरक्षण मधून काठिचा आधार द्यावा व नंतर पाणी द्यावे.

लागवडीनंतर एक महिन्याने हयुमिक ऍसिड पाण्यातून झाडांच्या मुळांना सोडावे.

खत व्यवस्थापन:-

वर्ष  शेणखत   नत्र   स्फुरद.  पालाश

1.     5kg    150g    50g     100g

2.    10kg   300g.  100g    200g

3.    15 kg   450g   150g   300g

4.    20kg    600g   200g   600g

5.    25kg   750g   250g   500g

फवारणी:- पावसाळा संपल्यानंतर झाडास नवीन पालवी येण्यास सुरुवात होते ही पालवी आल्यानंतर त्याच्यावरती बुरशी व किटक यांचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात होतो त्यासाठी प्रत्येक महिन्यात पहिल्या आठवड्यात बुरशीनाशक व तिसऱ्या आठवड्यात कीटकनाशक यांची फवारणी करावी व प्रत्येक वर्षी मे किंवा जून महिन्यामध्ये झाडांच्या खोडाला बोर्डो पेस्ट करून घ्यावी म्हणजे झाडाला खोड किडीचा प्रादुर्भाव होत नाही.

🌳!!अन्नदाता सुखी भव!!🌳

  🌴साई हायटेक नर्सरी🌴

 मु.पो.सिंगापूर ता.पुरंदर जि.पुणे.

Mob No.: 9822900546

Location*:https://maps.google.com/?cid=17826365743732073278

नाते विश्वासाचे एक वेळ अवश्य भेट दया.


Instagram Page :- https://www.instagram.com/saihitechnursery09/

Facebook Page :- https://www.facebook.com/saiHitechnurseryshingapur/







Saturday, 18 June 2022

लोटन_नारळ_लागवड । Coconut Tree Plantation | Sai Hitech Nursery Singapore, Pune

 #लोटन_नारळ_लागवड

बटकी लोटन हे पाण्यासाठी म्हणजेच शहाळ्याचे नारळ आहे. सदर नारळ हे कमी उंचीचे असून याला साधारण साडेतीन ते चार वर्षांत फळं यायला सुरुवात होते.  सुरुवातीला फळांची संख्या कमी असते, विकसित झाडास वर्षभरात अडीचशे ते तीनशे नारळ येतात.

याची लागवड करतांना 15 फूट बाय 15 फूट अंतर ठेवावे, जमिनीत जर उदी (वाळवी) असेल तर 2 ते 3 फुटाचा खड्डा करून तळाशी थाईमेट चुटकीभर टाकून त्यावर थोडी माती टाकावी, मुरमाड जमिनीत 3 फुटाचा खड्डा करून वाळू मिक्स लाल, पिवळी माती मिसळावी, काळी माती असेल तर वाळूचे प्रमाण 50% माती 25% व कम्पोस्ट 25% असे ठेवावे व खड्डा भरून घ्यावा. मिठाचा वापर टाळावा. या नारळाचे जुने पान नैसर्गिकरित्या वाळून वेगळे झाल्यास काढावे, पानं कापू नयेत. या झाडास सर्वसाधारण पाण्याची गरज असते. अतिशय कमी पाण्याच्या जागेवर याची वाढ मंदावते म्हणून पावसाळ्यात याची लागवड केल्यास फायद्याचे ठरते. सुरुवातीला 1 वर्ष पाण्याची काळजी घ्यावी आपल्या जमिनी (माती)नुसार पाण्याची गरज ओळखावी व नियमित गरजेनुसार पाणी द्यावे. कायम पाणी साठू देऊ नये अन्यथा मुळ्या सडून झाडाचे नुकसान होऊ शकते. 

अधिक माहिती साठी संपर्क साधावा.

*🌴साई हायटेक नर्सरी🌴*

 *मु.पो.सिंगापूर ता.पुरंदर जि.पुणे.*

 *Mob No.: 9822900546* 

Location:https://maps.google.com/?cid=17826365743732073278

Facebook Page :- https://www.facebook.com/saiHitechnurseryshingapur/





सिताफळ_लागवड | Sugar apple Plantation |

#सिताफळ_लागवड:-
 पुरंदरच्या या जातीची फळे आकर्षक आणि आकाराने मोठी असून फळाचे वजन हे 360 ते 388 ग्राम असून गराचे प्रमाण हे 45 48 टक्के आहे. प्रत्येक झाडापासून 118 ते 154 फळाचे उत्पादन मिळते फळातील विद्राव्य घटकांचे प्रमाण 22 ते 24 टक्केव घट्ट रसाळ आणि आल्हाददायक असतो घरातील पाकळ्या पांढऱ्याशुभ्र असून त्यांची संख्याही जास्त आहे फळात बियांची संख्या अतिशय कमी असून जातीच्या फळांचा ग्राम पासून तयार केलेल्या रबडीला जास्त मागणी आहे.

 #हवामान :-
 सीताफळासाठी हवामान लक्षात घेता कोरडे व उष्ण हवामान सिताफळास मानवते. कुठल्याही परिस्थितीत तग धरून जिवंत राहणे हे या फळझाडाचे वैशिष्ट्य आहे. सीताफळास जास्त पाण्याची गरज असते आणि फळे येताना उबदार व कोरडे हवामान असल्यास फळांमध्ये गोडी चांगली येते मात्र दमट हवामानात वाढ चांगली होते.

जमिन:- 
सीताफळ या पिकासाठी हलकी ते मध्यम सांगली निचरा होणारी दोन ते तीन टक्के उताराची सेंद्रिय पदार्थ भरपूर असणारी जमीन असावी लागते. काळी भारी पाणी साचून राहणारी अल्कलीयुक्त अगर चोपण जमिनीत लागवड करू नये तसेच एक फुटाच्या खोलीवर खडक लागल्यास लागवड थांबवावी.

 #लागवड :-
सिताफळ सिताफळाची लागवड करताना पाऊस पडल्यानंतर खड्ड्यांमध्ये कलमे अगर रोपे लावावीत रोपे लावताना मध्य भागी लहान खड्डा करून लावावी तसेच माती हाताने दाबून काठीचा आधार देउन बांधावी व पाऊस नसेल तर लगेच झारीने पाणी द्यावे. सीताफळ लागवड अंतर व्सियवस्ताथित ठेवावे लागते.  फळाचे लागवडीपूर्वी जमीन चांगली नांगरून कुळवून उन्हामध्ये तापवुन घ्यावे नंतर आपणास लागवड करावयाची आहे त्या अंतरानुसार खड्डे घ्यावेत प्रत्येक खड्ड्यात एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 100 ग्राम दोन टक्के मिथिल पॅराथिऑन पावडर यांचे मिश्रण टाकावे सोबत १०किलो शेणखत टाकावे त्याच्या वापरामुळे सिताफळाच्या वाढीस मदत होते.

#वळण_व_छाटणी :-
झाडांना योग्य वळण देण्यासाठी वाढीच्या सुरवातीच्या काळात हलक्या छाटणीची आवश्यकता असते. झाडे योग्य वळण देऊन एका बुंध्यावर वाढवली तर झाडे डोलदार वाढतात. अन्यथा अनेक फांद्या असलेले झुडूप तयार होते. वाढ कमी होऊन उत्पादन कमी राहते. - मिनीपासून १ मीटर खोडावरील सर्व फुटवे काढून त्यांच्या चारही बाजूने फांद्या विखुरलेल्या राहतील, अशा मोजक्याच फांद्या ठेवाव्यात. जुन्या, वाळलेल्या, अनावश्यक आणि गर्दी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात. बागेत भरपूर सूर्य प्रकाश व हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी.
लागवडीनंतर रोप ४ ते ५ महिन्यांत १.५ ते २ फुटाचे झाल्यावर त्याला ६ इंच ठेऊन वरील शेंडा कापून टाकावा. नंतर खोडातून येणाऱ्या फांद्यातून फक्त २  किंवा ३ फांद्या ठेवाव्यात. बाकीच्या फांद्या काढून घ्याव्यात. या फांद्यांना पुन्हा ४-५ महिने वाढू द्यावे.  परत V आकाराच्या दोन फांद्या प्रत्येक मुख्य फांदीला ठेऊन इतर फांद्या काढून टाकाव्यात. म्हणजे जर जून – जुलै मध्ये लागवड केली असेल तर पहिली छाटणी ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये आणि दुसरी छाटणी मे – जून महिन्यामध्ये करावी. अशा प्रकारे छाटणी केल्यास दोन वर्षात १६ ते २४ फांद्याचे उत्कृष्ट झाड तयार होते.

#खते:-
पूर्ण वाढलेल्या झाडास ३० ते ४० किलो शेणखत, नत्र २५० ग्रॅम, स्फुरद १२५ ग्रॅम व पालाश १२५ ग्रॅम प्रति झाड प्रति वर्ष. नत्र दोन समान हफ्त्यांमध्ये विभागून द्यावे. शेणखताबरोबर ॲझोस्पीरीलम व पी.एस.बी. या जीवाणू खतांचा वापर करावा.
#टिप - अधिक माहितीसाठी साई हायटेक नर्सरी सिंगापूर येथे खालील नंबर वर संपर्क करावा.
 
🌴साई हायटेक नर्सरी🌴
 मु.पो.सिंगापूर ता.पुरंदर जि.पुणे.
 Mob No.: 9822900546, 9049431068.









सिताफळ_लागवड | Sugar Apple Plantation | साई हायटेक नर्सरी मु.पो.सिंगापूर ता.पुरंदर जि.पुणे. | (+91) 9822900546

साई हायटेक नर्सरी  मु.पो.सिंगापूर ता.पुरंदर जि.पुणे.  Mob No.: (+91) 9822900546, (+91) 9049431068 Instagram Page :- https://www.instagram.co...