आंबा लागवड
जमिन:- पाण्याचा निचरा होणारी जमीन आंबा लागवडीसाठी योग्य असते. चुनखड व कठीण असणाऱ्या जमिनीमध्ये आंबा लागवड करू नये. चोपण व काळया जमिनीमध्ये सुद्धा आंबा लागवड शक्यतो टाळावी.
खड्डा:- जूनमध्ये आपणास लागवड करावयाची असल्यास आपण एप्रिल महिन्यात एक मीटर बाय एक मीटर चा खड्डा घ्यावा व पूर्ण एक महिना तो उन्हामध्ये तापुन द्यावा. मे महिन्यामध्ये तो खड्डा भरावयास घ्यावा व प्रथम त्यामध्ये 50 ग्रॅम थाईमीठ टाकावे नंतर आपल्या शेतातील पालापाचोळा टाकावा, पालापाचोळा वरती थोडी माती टाकून त्यावरती 100 ग्रॅम सुपर सिंगल फॉस्फेट टाकावे व नंतर त्यावर ती दोन घमेली शेणखत टाकून खड्डा बुजवून घ्यावा व झाडाला आधार देण्यासाठी एक मधोमध काठी लावावी.
:https://maps.google.com/?cid=17826365743732073278
लागवड:- आंबा लागवड करताना शक्यतो लहान रोपांची निवड करावी रोपे जर मोठी असतील तर त्या रोपांची पिशवी ही मोठी असली पाहिजे जेणेकरून त्या झाडांच्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे झालेली असावी. लागवड करताना त्या झाडाची पिशवी अलगद ब्लेडने कापून घ्यावी व त्या मातीचा गड्डा फुटू देऊ नये. पिशवी काढल्यानंतर अलगच हे झाड आपण खोदलेल्या खड्ड्यात लावावे व त्याला वाऱ्यापासून संरक्षण मधून काठिचा आधार द्यावा व नंतर पाणी द्यावे.
लागवडीनंतर एक महिन्याने हयुमिक ऍसिड पाण्यातून झाडांच्या मुळांना सोडावे.
खत व्यवस्थापन:-
वर्ष शेणखत नत्र स्फुरद. पालाश
1. 5kg 150g 50g 100g
2. 10kg 300g. 100g 200g
3. 15 kg 450g 150g 300g
4. 20kg 600g 200g 600g
5. 25kg 750g 250g 500g
फवारणी:- पावसाळा संपल्यानंतर झाडास नवीन पालवी येण्यास सुरुवात होते ही पालवी आल्यानंतर त्याच्यावरती बुरशी व किटक यांचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात होतो त्यासाठी प्रत्येक महिन्यात पहिल्या आठवड्यात बुरशीनाशक व तिसऱ्या आठवड्यात कीटकनाशक यांची फवारणी करावी व प्रत्येक वर्षी मे किंवा जून महिन्यामध्ये झाडांच्या खोडाला बोर्डो पेस्ट करून घ्यावी म्हणजे झाडाला खोड किडीचा प्रादुर्भाव होत नाही.
🌳!!अन्नदाता सुखी भव!!🌳
🌴साई हायटेक नर्सरी🌴
मु.पो.सिंगापूर ता.पुरंदर जि.पुणे.
Mob No.: 9822900546
Location*:https://maps.google.com/?cid=17826365743732073278
नाते विश्वासाचे एक वेळ अवश्य भेट दया.
Instagram Page :- https://www.instagram.com/saihitechnursery09/
Facebook Page :- https://www.facebook.com/saiHitechnurseryshingapur/
.jpg)
.jpg)
.jpg)

No comments:
Post a Comment