Showing posts with label लोटन_नारळ_लागवड sai hitech nursery Sai Hitech Nursery Singapore. Show all posts
Showing posts with label लोटन_नारळ_लागवड sai hitech nursery Sai Hitech Nursery Singapore. Show all posts

Saturday, 18 June 2022

लोटन_नारळ_लागवड । Coconut Tree Plantation | Sai Hitech Nursery Singapore, Pune

 #लोटन_नारळ_लागवड

बटकी लोटन हे पाण्यासाठी म्हणजेच शहाळ्याचे नारळ आहे. सदर नारळ हे कमी उंचीचे असून याला साधारण साडेतीन ते चार वर्षांत फळं यायला सुरुवात होते.  सुरुवातीला फळांची संख्या कमी असते, विकसित झाडास वर्षभरात अडीचशे ते तीनशे नारळ येतात.

याची लागवड करतांना 15 फूट बाय 15 फूट अंतर ठेवावे, जमिनीत जर उदी (वाळवी) असेल तर 2 ते 3 फुटाचा खड्डा करून तळाशी थाईमेट चुटकीभर टाकून त्यावर थोडी माती टाकावी, मुरमाड जमिनीत 3 फुटाचा खड्डा करून वाळू मिक्स लाल, पिवळी माती मिसळावी, काळी माती असेल तर वाळूचे प्रमाण 50% माती 25% व कम्पोस्ट 25% असे ठेवावे व खड्डा भरून घ्यावा. मिठाचा वापर टाळावा. या नारळाचे जुने पान नैसर्गिकरित्या वाळून वेगळे झाल्यास काढावे, पानं कापू नयेत. या झाडास सर्वसाधारण पाण्याची गरज असते. अतिशय कमी पाण्याच्या जागेवर याची वाढ मंदावते म्हणून पावसाळ्यात याची लागवड केल्यास फायद्याचे ठरते. सुरुवातीला 1 वर्ष पाण्याची काळजी घ्यावी आपल्या जमिनी (माती)नुसार पाण्याची गरज ओळखावी व नियमित गरजेनुसार पाणी द्यावे. कायम पाणी साठू देऊ नये अन्यथा मुळ्या सडून झाडाचे नुकसान होऊ शकते. 

अधिक माहिती साठी संपर्क साधावा.

*🌴साई हायटेक नर्सरी🌴*

 *मु.पो.सिंगापूर ता.पुरंदर जि.पुणे.*

 *Mob No.: 9822900546* 

Location:https://maps.google.com/?cid=17826365743732073278

Facebook Page :- https://www.facebook.com/saiHitechnurseryshingapur/





सिताफळ_लागवड | Sugar Apple Plantation | साई हायटेक नर्सरी मु.पो.सिंगापूर ता.पुरंदर जि.पुणे. | (+91) 9822900546

साई हायटेक नर्सरी  मु.पो.सिंगापूर ता.पुरंदर जि.पुणे.  Mob No.: (+91) 9822900546, (+91) 9049431068 Instagram Page :- https://www.instagram.co...